केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव व धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे ( Pankja Munde) यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करताना एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणखी नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोललो आहोत, मात्र काय बोललो याबाबत माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडेंच्या या खुलाश्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याच कारण म्हणजे काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात यायची ऑफर (Offer) दिली होती. पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे ठाकरे गटाचे नेते म्हणाले होते.
बनावट नोटा ओळखा आता चक्क मोबाईलवर! करा ‘या’ अँप्सचा वापर
दरम्यान ठाकरे व शिंदे गटाच्या वादावर बोलताना पंकजा मुंडे यांनी समतोल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ” एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एवढेच नाही तर सत्तेत असल्याने आपल्यासोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे नाव नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणे हा ठाकरे यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. यामध्ये पुढे काय घडतं याचे मला कुतूहल आहे.”
पोलीस भरतीमध्ये धावता धावता तरुणाचा मृत्यु! वयाच्या 26 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास