भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. ऋषभच्या अपघातांनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आता ऋषभचा सहकारी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अंबानी कुटुंबातील छोटी सुनबाई राधिका नक्की कोण आहे? जाणून घ्या अधिक…
दिनेशने याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्याने लिहिले की, “अपघाताची माहिती ऐकून खरोखरच धक्का बसला. तो धोक्याबाहेर आहे हे जाणून बरे वाटले. तुझ्यासोबत माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा! भाऊ लवकर बरा हो”.
Also request everyone to pls pls not share photos of him in bandages & injuries and give him & his family some space and privacy. Let’s be human 🙏
— DK (@DineshKarthik) December 30, 2022
त्याचबरोबर पुढे अजून एक ट्विट शेअर करत त्याने लोकांना आवाहन केले आहे की, “प्रत्येकाला विनंती आहे की कृपया प्लीज त्याचे बँडेज आणि जखमांचे फोटो शेअर करू नका आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला स्पेस द्या. असे देखील त्याने ट्विट केले आहे.
‘या’ कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत ऋष पंत यान माहिती दिली आहे. ऋषभ पंत म्हणाला आहे की, मी स्वत: गाडी चालवत होतो, गाडी चालवत असतान अचानक मला झोप आली अन् कार रेलिंगला धडकली. आणि कार धडकल्यानंतर तो विंग स्क्रीन तोडून बाहेर आला, असं पंतनं सांगितलं आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सवर माधुरी पवारची प्रतिक्रिया, म्हणाली, “तर कलाकाराच्या कलेचा आदर…”