गाडी चालवण्यावरून अनेकदा मुलींना ट्रोल केले जाते. गाडी चालवताना मुलींकडून नकळत बऱ्याच चुका होतात. परंतु बहुतेक वेळा त्या आपली चूक मान्य करत नाहीत. यामुळे अनेकदा ‘पापा की परी’ (Papa ki Pari) वैगरे म्हणून मुलींना हिनवले जाते. मुलींनी गाडी चालवताना कुणालातरी गाडी ठोकल्याचे किस्से वारंवार घडत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक तरुण मुलगी रस्त्याकडे उभ्या असलेल्या मोटारसायकल स्वाराला स्कुटी वरून धडकल्याचे पहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन
खरंतर या व्हिडिओमध्ये ( Viral Video) एक तरुण रस्त्याच्या कडेला मोटारसायकलीवर बसलेला असतो. यावेळी स्कुटी वरून अत्यंत वेगात येणारी एक मुलगी तरुणाच्या मोटारसायकलीला जोराची धडक देते. यावेळी मोटार सायकलीवरील तरुण खाली पडतो. यानंतर जे घडलंय ते मात्र भयंकर आहे. आपली स्वतःची चूक असूनही, व्हिडीओमधील तरुणी त्या तरुणाला मदत न करता उलट त्यालाच ओरडायला लागते.
मानसी नाईकच्या नवऱ्याचे न्यूड फोटो पहिले का? पाहा PHOTO
तुला गाडी नीट चालवता येत नाही का ? असे म्हणत ही तरुणी ( Scooty Girl) अपघाताचा सगळा दोष त्या एकट्या तरुणावर ढकलते. यामुळे ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार इथं घडलेला पहायला मिळतोय. त्या तरुणाचे हाल पाहून नेटकरी कमेंट मध्ये हळहळ व्यक्त करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील मजेशीर आहेत.
ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या मृत्यूची बातमी खोटी; पत्नीने दिली खरी माहिती