Pappu Yadav । राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी (४ एप्रिल) नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पप्पू यादव यांनी बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पप्पू यादव मोटरसायकलवरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पप्पू यादव जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले आणि लोकांशी बोलल्यानंतर ते मंचावरच लहान मुलासारखे रडू लागले.
पप्पू यादव का रडू लागले?
जाहीर सभेला संबोधित करताना पप्पू यादव अचानक भावूक झाले आणि जनतेसमोर रडायला लागले. यावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यावर पूर्णियाच्या लोकांसोबत भावनिक पत्ते खेळल्याचा आरोप केला. जनतेला संबोधित करताना पप्पू यादव यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
ते जनतेला म्हणाले, ‘अखेर माझ्यात काय कमी आहे? मला वारंवार धमक्या का दिल्या जात आहेत, मला ही जागा सोडा, मधेपुराला जा, सुपौलला जा असे का सांगितले जात आहे. यानंतर ते म्हणाले होते की, काँग्रेस पक्षात येण्यापूर्वीच मी लालू यादव यांची भेट घेतली होती आणि त्यांना सांगितले होते की, मी पूर्णिया सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी पूर्णियातूनच निवडणूक लढवणार आहे. असे असतानाही पूर्णिया येथून आरजेडीला उमेदवारी देण्यात आली. असं ते म्हणाले आहेत.
Car accident । भीषण अपघात! भरधाव कार झाडावर आदळली, ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता