Site icon e लोकहित | Marathi News

Parbhani Accident News । स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अतिशय भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Accident

Parbhani Accident News । सध्या परभणी जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीचा आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. माहितीनुसार रविवारी हा अपघात घडला आहे.

Viral News । धक्कादायक घटना! देवाची कान पकडून माफी मागितली अन् थेट मूर्ती चोरून पळून गेला

हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ आणि दुचाकी आगीच्या कचाट्यात सापडली होती. यामध्ये सोनपेठ येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तेथील परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

Munawwar rana । मोठी बातमी! प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे कर्तव्य बजावून सोनपेठवरून पाथरीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली आणि हा अपघात झाला. (Parbhani Accident News)

ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक यांची दुचाकी गाडी लांब पर्यंत फरपटत गेली. याचवेळी दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि या अपघातामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक गवारे हे देखील जागेवरच ठार झाले आहेत.

Viral Video । प्रवाशांसाठी कॅब चालक भिडले, जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

आपली ड्युटी संपवून पोलीस उपनिरीक्षक घरी चालले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. आता पोलीस यंत्रणा याबाबत अधिकचा तपास करत आहे.

Spread the love
Exit mobile version