नवी दिल्ली | बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिची एंगेजमेंट झाल्याचा दावा मीडियामधून गेले अनेक दिवस केला जात आहे. हाच गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
उर्फी जावेदचे ‘ते’ ट्विट चर्चेत; म्हणाली, ‘नग्न तर सगळेच आहेत पण…’
नुकताच आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा (MP Sanjeev Arora) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळं आता परिणीती आणि खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांच्या अफेयरच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला असून लग्नाची बोलणी सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
आता आलं समोसा बिर्याणीचं फ्युजन, सोशल मीडियावर चर्चा
राघव चड्ढा आणि परिनीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा असं ट्विट(Tweet) खासदार संजीव अरोरा यांनी केलं आहे. हे ट्विट परिणीती आणि राघव यांच्या साखरपुडा झाल्याचं समजून त्यांना शुभेच्छा देत आहेत.
वडिलांचा लव्हमॅरेज करण्यास विरोध, नंतर बाप लेकीमध्ये झाले भांडण; अन् बापाने बंदूक काढून थेट…
चोप्रा आणि चढ्ढा यांना मुंबईत एकत्र पाहिल्यानंतर लगेचच त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आप नेत्यांनी केलेल्या ट्विटमुळं या दोघांच्या नात्यांवर शिक्कामोर्तब झालं आहे. आता राघव चड्ढा आणि परिनीती कधी लग्नगाठ बांधणार यांची परिणीतीच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.