दिवसेंदिवस काळ बदलतोय. वडापावची जागा बर्गरने घेतलीये, चहा ची जागा कॉफीने घेतलीये. माणसाच्या खाण्याच्या पद्धतींमध्ये प्रचंड फरक पडलाय. मात्र आजही भारतात पार्ले जी ( Parle G) या बिस्किटाची जागा कोणी घेतली नाही. भारतात पार्ले जी चा एक वेगळा फॅनबेस आहे. हे बिस्कीट ( Biscuit) आजही लोक तितक्याच चवीने खातात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत सगळीकडे हे बिस्किट आवडीने खाल्ले जाते.
मुंबई मध्ये १९३८ मध्ये पार्ले बिस्किट पहिल्यांदा तयार झाले होते. त्यावेळी त्याचे नाव पार्ले ग्लोको असे होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र काही काळ या बिस्किटाचे उत्पादन थांबले होते. नंतरच्या काळात परत ही या बिस्किटाची कंपनी सुरू झाली. मात्र त्यावेळी बिस्किटाचे नाव बदलण्यात आले होते. पगले जी असे नाव त्यावेळी होते. नंतर दोन हजार मध्ये त्याचे नाव पार्ले-जी झाले.
Accident । कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू
या बिस्किटाचा इतिहास तर रंजक आहेच. परंतु पार्ले जी बिस्किटाची बाहेरील देशांना सुद्धा भुरळ आहे. अमेरिकेत ( America) हे बिस्किट आवडीने खाल्ले जाते. मात्र बाहेरील देशात पार्ले जी जास्तीच्या किंमतीत विकले जाते. भारतात ५ रुपयांमध्ये मिळणारा पार्लेचा बिस्कीट पुडा अमेरिकेत १० रुपयांना मिळतो. तसेच पाकिस्तान मध्ये याची किंमत ५० रुपये आहे. (Price of Parle G in America & Pakistan)