![Parliament Winter Session 2023](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2023/12/Parliament-Winter-Session-2023-1024x576.jpg)
Parliament Winter Session 2023 । महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरात हे अधिवेशन आयोजित करण्यात आहे. “महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबर रोजी संपेल,” असे विधान भवन येथील राज्य विधिमंडळ संकुलातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नुकत्याच चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी संबोधित करतील. या अवधेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Parliament Winter Session 2023)
दरम्यान आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे. माहितीनुसार, या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत.