विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली आहे. ही भेट शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर झाल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. आता या भेटीवर गपिचंद पडळकर यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
आताची सर्वात मोठी बातमी! राखी सावंतला अटक
गोपीचंद पडळकर म्हणाले, “पार्थ पवार अस्वस्थ असल्यामुळे शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. नुकतंच रोहित पवार यांची मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पदी निवड देखील झाली. शरद पवार यांच्याकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. त्यामुळेच ही भेट झाली असावी”, असे पडळकर म्हणाले आहेत.
२३ जानेवारी २०२३ ला येतंय बाळासाहेब ठाकरेंबद्दल नाटक
दरम्यान, पार्थ पवार (Parth Pawar) आणि शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांच्यामध्ये सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; अपघातात श्रीगोंद्यातील ६ जण गंभीर जखमी