Pat Cummins IPL Price । आयपीएलची इतिहासातील सर्वात मोठी 20 कोटींची बोली, पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा खेळाडू

Pat Cummins IPL Price

Pat Cummins IPL Price । इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली दिसली आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, त्याच्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चुरशीची लढत झाली.

Supriya Sule । लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाल्या?

स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असून अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता आणि आता सर्वांना आश्चर्यचकित करत पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Congress । काँग्रेसला मोठा धक्का! या आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

पॅट कमिन्सची बोली 2 कोटी रुपयांपासून सुरू झाली, जेव्हा सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी पहिली बोली लावली आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बोलीमध्ये सामील झाले. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्ससाठी आपली बोली सोडली नाही आणि शेवटी त्याला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. पॅट कमिन्सने आयपीएलमध्ये केवळ 42 सामने खेळले आहेत, त्याच्या नावावर 379 धावा आहेत आणि त्याने केवळ 45 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच विक्रमी सरासरी असतानाही पॅट कमिन्सवर एवढा पैसा बरसला आहे, अशा स्थितीत हैदराबादने मोठा जुगार खेळला आहे, असे म्हणता येईल.

Sharad Pawar | 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवारांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love