शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट काल रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते तो अखेर काल रिलीज झाला आहे. काल देशातील अनेक थिएटर्स हाऊसफुल्ल देखील झालेत. मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसापासून हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील होता.
रँगिगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
दरम्यान, या चित्रपटाच्या कमाईबाबत पहिले तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण ५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. “हिंदी भाषेमधील चित्रपटाने ५५ कोटी रुपये कमावले तर डब केलेल्या चित्रपटाने २ कोटी रुपये कमावले. पहिल्याच दिवशी चित्रपटाने एकूण ५७ कोटी रुपये कमावले आहेत. याबाबत कोमल नाहटा यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लागली १ कोटींची लॉटरी; गावाने काढली जंगी मिरवणूक
दरम्यान, हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच ४.१९ लाखांपेक्षा जास्त अँडवान्स बुकींग देखील झालेलं आहे. हा सिनेमा जवळपास ४० ते ५० कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी सिनेअभ्यासकांकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झाला आहे.
प्रजासत्ताक दिनी हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या!