Site icon e लोकहित | Marathi News

Patiala News । धक्कादायक घटना! ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Patna News

Patiala News । गरीब असो किंवा श्रीमंत असो आजकाल सर्वच जण आपल्या मुलांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करतात. सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे खाद्यपदार्थ देखील ऑनलाईन मागविले जातात. मात्र सध्या अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातून एका 10 वर्षीय मुलीचा वाढदिवसानिमित्त ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News । धक्कादायक! पुण्याजवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकताच….

त्याचबरोबर कुटुंबातील चार सदस्यांची प्रकृती खालावल्याची देखील माहिती मिळत आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केक शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत पंजाबच्या पोलिसांनी सांगितले की, 25 मार्च रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, अमन नगर, पटियाला येथे राहणाऱ्या काजलने सांगितले की, 10 वर्षीय मानवीचा वाढदिवस 24 मार्च रोजी होता. वाढदिवसानिमित्त संध्याकाळी ६ वाजता एका कंपनीतून ऑनलाइन केक मागवला होता. जो सायंकाळी साडेसहा वाजता घरी पोहोचवण्यात आला.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 उमेदवारांची नावे केली जाहीर, जाणून घ्या कोण कुठून उमेदवार?

त्यानंतर सायंकाळी 7.15 च्या सुमारास केक कापण्यात आला. केक खाल्ल्यानंतर मानवी आणि तिच्या कुटुंबीयांची प्रकृती ढासळू लागली. तिला उलट्याही झाल्या. मुलगी रात्री झोपली. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी पाहिले की मुलीचा मृतदेह थंड पडला होता, त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीच्या घरच्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.

Vijay Shivtare । विजय शिवतारे यांनी सांगितलं माघार घेण्यामागचं मोठं कारण; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version