आजकाल उच्चशिक्षित लोक सुद्धा नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळालेले पहायला मिळत आहेत. हे लोक आधुनिक पद्धतीने शेती करून मोठा आर्थिक फायदा मिळवत आहेत. करमाळा येथील एक तरुण इंजिनिअर असाच शेतीकडे वळाला असून त्याने चक्क लाल केळीचे उत्पादन घेतले आहे. खरंतर लाल केळी ( Red Banana) व वेलची केळी या दोन्ही केळींच्या उत्पादनात केरळची मक्तेदारी होती. परंतु, करमाळा येथील या तरुण शेतकऱ्याने या दोन्ही प्रकारच्या केळ्यांचे उत्पादन करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
धक्कदायक! पळून गेलेल्या पोटच्या मुलीला बापानेच लटकवलं फासावर
लाल रंगांच्या केळीला आयुर्वेदात ( Aayurveda) विशेष स्थान आहे. ही केळी औषधी व गुणकारी म्हणून ओळखली जाते. यामुळे उच्चवर्गीय कुटुंबात या केळीला मोठी मागणी असते. तसेच वेलची केळी सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. या केळींचे बाजारातील दर पाहूनच अभिजीत पाटील या तरुण इंजिनिअरने याबद्दल उत्सुकतेने माहिती काढली. या केळींची ख्याती व मोठी किंमत कळल्यावर अभिजीत यांनी फक्त कर्नाटक व तामिळनाडू येथे पिकणारी ही केळी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील वाशींबे गावात लावण्याचा निर्णय घेतला.
धक्कदायक! पळून गेलेल्या पोटच्या मुलीला बापानेच लटकवलं फासावर
याआधी अभिजीत यांच्या शेतात G9 जातीची केळी होती. परंतु, या केळीला दर न्हवता. मात्र 2015 मध्ये अभिजीतने 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने 7 एकरवर लागवड केली. यानंतर दहाव्या महिन्यात अभिजीत यांना एकरी 12 ते 15 टन इलायची केळीचे 50 रुपये किलोप्रमाणे लाखोंचे उत्पन्न मिळाले. या यशानंतर अभिजीतने हीच वेलची केळी 30 एकरात केली आणि दर दहा महिन्यांनी त्यांना दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू लागले.