श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात लिंबाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. परवडत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी लिंबाच्या बागा काढल्या पण दोन वर्षात याच लिंबाला चांगला भाव मिळतोय. यामध्येच आता श्रींगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील प्रगतशील शेतकरी दिलीपकाका काकडे यांच्याकडे २३४ झाडांची लिंबाची बाग आहे. यामधून त्यांना जवळपास त्यांना वर्षाला चार ते साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
अल्पवयीन मुलाला फुस लावून नेले पळवून, पुढील तपास सुरू
दिलीप काकडे हे नागवडे कारखान्याने माजी संचालक, त्याचबरोबर गावचे माजी उपसरपंच देखील राहिले आहेत. ते शेतातून जास्त उत्पन्न मिळावे या दृष्टीने शेतीमध्ये वेगेवेगळे उपक्रम देखील राबवत आहेत.
Sharad Pawar: “शिवसेनेनेही नवीन चिन्ह घ्यावे आणि निवडणूक लढवावी” – शरद पवार
त्याचबरोबर ते उसासोबत कांदा आणि लिंबू हे तीनच पिके आहेत. सध्या लिंबाला चांगले मार्केट आहे. हे आठवड्याला जवळपास सुमारे सातशे ते आठशे किलो लिंबू शेतातून व्यापारी घेवून जातात. सध्या लिंबाला साठ रुपयांच्या आसपास भाव मिळत असून हाच दर मागच्या काही दिवसांपुर्वी शंभराच्या घरात होता.