शेतकऱ्यांना शेतीतून नेहमीच हवे तसे उत्पन्न मिळत नाही. यामुळे आजकाल शेतकरी पारंपरिक शेती सोबतच इतर देखील व्यवसाय करत आहेत. यामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हिंगोली तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर चक्क खेकडे पालनाचा (crab farming ) व्यवसाय सुरू केला आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा शेतकरी फक्त युट्युबवरून माहिती घेऊन हा व्यवसाय करत आहे.
हिंगोली जिल्ह्यामधील बाभूळगावच्या भारत जहरव या प्रयोगशील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीत हा व्यवसाय सुरू केला आहे. भारत यांनी युट्युबवर खेकडे पालनाचा व्हिडीओ ( Youtube video of crab farming) पाहिला होता. हा व्हिडीओ पाहून त्यांनी देखील आपल्या शेतात हा व्यवसाय करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी त्यांच्या शेतात वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल असे शेततळे तयार केले. या शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकून भारत यांनी बीज रुपात 2 क्विंटल खेकडे सोडले.
भारत जहरव यांनी जवळजवळ एक वर्षभर हे खेकडे जोपासले. या व्यवसायामध्ये फारसे भांडवल घालावे लागत नाही. ( Buisness with less investment) खेकड्यांना खाद्य म्हणून चिकन व मासे यांचे वेस्टज दिले जाते. या व्यवसायात फक्त 9 महिन्यांमध्ये खेकडे विक्रीसाठी तयार होतात. जहरव यांच्या शेतात सध्या 12 क्विंटलहून अधिक खेकडे विक्रीसाठी तयार असून 500 रुपये किलोप्रमाणे खेकड्यांची विक्री होत आहे. या व्यवसायातून अवघ्या 9 महिन्यांत त्यांना सहा लाख रुपये उत्पादन मिळाले आहे.
बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबारप्रकरणी पाच जणांना अटक