सोलापूर: ऊस कारखानदार (sugarcane factory) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोलापुर जिल्ह्यातील (Solapur district) ऊस दराचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. याच महत्वाचं कारण म्हणजे कारखानदारांनी उसाची पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी अशी मागणी (demand) केली आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर, सहकार मंत्र्यांच्या निवासस्थाना समोर बोंबा बोंब आंदोलन (movement) करण्याचा इशारा जनाहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
WhatsApp: व्हॉट्सअॅपची सेवा सुरु, नेमकी का बंद होती सेवा? वाचा सविस्तर
रविवार 23 ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे ऊस परिषद संपन्न झाली. दरम्यान या परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उसाला प्रति टन पहिली उचल अडीच हजार रुपये मागीतली आहे. परंतु त्या मागणीला जनहित शेतकरी संघटनेचा कडाडुन विरोध आहे. याच महत्वाचं कारण म्हणजे कांही कारखानदार गेल्या चार ते पाच वर्षापासून अडीच हजार रुपये देतात. इतकंच नाही तर वाढीव पैसे कारखान्याच्या सोयी प्रमाणे दिले जातात.
शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव
त्यामुळे कारखान्यांची चालू परिस्थिती पाहीली तर खताच्या किमतीत दरवर्षी 200 ते 300 रुपये दर वाढ होते. याकडे शासन लक्ष देत नाही. शेत मजुरी वाढत आहे. सकाळी आठ वाजता शेतात कामाला गेलेला मजुर दुपारी एक वाजता घरी आला तर येताना चारशे रुपये मजुरी घेऊन येतो.इतकंच नाही तर शेती पंपाचे विज बिल तसेच मशागतीचे दरही वाढले आहेत.त्यामुळे अडीच हजार रुपये पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारी नाही.
शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट सहकार मंत्री यांनी लक्ष घालुन पहिली उचल तीन हजार रुपये कारखानदारांना देण्यास भाग पाडावे. 100 रुपये पोळ्याच्या सणाला व 100 रुपये दिवाळीला वाढीव जाहीर करावी. अशी मागणी करण्यात येत आहे. कारण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार पहिली उचल 3 हजार 200 ते 3 हजार 400 रुपये देतात. ही तर काहीच नाही कर्नाटकात तर चार हजार रुपये दर दिला जातो. मग सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनाच का परवडत नाही. असा प्रश्नदेखील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव
तसेच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार गेल्या कित्येक वर्षापासून ऊस दरा बाबत शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनहित शेतकरी संघटनेची बैठक आयोजीत करून यावर योग्य तोडगा काढलाच पाहिजे. इतकंच नाही तर रिकव्हरी कितीही असो पहिली उचल 3 हजार देणे शासनाने बंधनकारक करावे. आणि रिकव्हरीवर उपाय काढलाच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष देशमुख यांनी केली आहे.