भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य असूनही समाजात अनेकदा धर्मवादावरून चुकीच्या घटना घडतात. काल ख्रिसमस ( Chirsmas) होता. ख्रिश्चन धर्मियांचा सगळ्यात मोठा सण म्हणून ख्रिसमस ओळखला जातो. या दरम्यान गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सांता क्लॉज बनलेल्या एका तरुणाला लोकांनी भरपूर मारहाण केली आहे.
गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक आवाहन; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”
त्याच झालं असं की, गुजरातच्या बडोद्यामध्ये एक व्यक्ती सांता क्लॉजचे कपडे घालून गिफ्ट ( gifts) वाटत फिरत होता. यावेळी मकरापुरातील रहिवाशी वसाहतीत एकत्र त्याला जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
शशीकांत डाभी असे सांता च्या पोशाखात गिफ्ट वाटणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मकरापूर ( Malkapur) परिसरातील एका सोसायटीमध्ये लोकांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी शशिकांत पोहचला होता. त्यावेळी ख्रिश्चन समाजाचे इतर नेते देखील होते.
“…तर संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले असतील”; शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट
शशिकांत ख्रिश्चन घरात जाऊन गिफ्ट देत असताना काही लोकांचा एक गट अचानक ख्रिश्चन कुटुंबात घुसला. यावेळी त्यांनी अचानक सांता क्लॉजवर हल्ला केला. इतकंच नाही तर जमावाने शशिकांत यांना पोशाख काढायला लावला. हा परिसर हिंदूंचा असल्याने येथे अशाप्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असे या जमावाचे मत होते.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरणे पडले महागात; ‘या’ नेत्यावर झाले इतके गुन्हे दाखल