जनतेला महागाईपासून मिळाला दिलासा, आता ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर

People got relief from inflation, now LPG cylinder is cheaper by Rs

जनतेला नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने
जनतेला दिलासा देत व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. परंतु सरकारने घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. महत्वाची बाब म्हणजे सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. परंतु 6 जुलै 2022 पासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जात असतात. इतकंच नाही तर इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या दरातदेखील बदल करत असतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडर दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती.

“..अरे, ही तर पापा की परी”, तरुणीची उभ्या ट्रकला स्कूटीची जोरदार धडक, व्हिडिओ व्हायरल

असे आहेत व्यावसायिक सिलिंडरचे दर?

पूर्वी लोक मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 मध्ये घेत असत. परंतु दिलासादायक बाब ही आहे की, याच सिलिंडरसाठी 1696 रुपये मोजावे लागतात. तसेच इंडेन एलपीजी 19 किलोच्या सिलेंडर यापूर्वी 1859.5 रुपये होता. परंतु आता याची नवीन किंमत 1744 रुपये आहे. दरम्यान याच व्यावसायिक सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1846 रुपये असेल. तसेच पूर्वी लोकांना याच व्यावसायिक सिलिंडरसाठी 1995.50 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी यापूर्वी 2009.50 रुपये मोजावे लागत होते. परंतु आता याच सिलिंडरसाठी 1893 रुपये द्यावे लागत आहे.

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, ‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *