आपण नेहमी पडद्यावर पाहतो की नायक सत्याला साथ देतो आणि लोकांना मदतही करतो. पण खऱ्या आयुष्यात असे करणारे फार कमी लोक असतात. त्यापैकी एक म्हणजे सोनू सूद (Sonu Sood) त्याने आपल्या कामातून हे सिद्ध केले आहे की तो खऱ्या आयुष्यात खरा हिरो आहे.
‘तारक मेहता..’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘हा’ अभिनेता घेणार टप्पूची जागा
सोनू कोरोना महामारीत मसिहा म्हणून समोर आला आहे. प्रवासी मजुरांना देखील त्याने खुप मदत केली आहे. सोनू सूदने केलेल्या कामांमुळे सोनूच्या नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे. तिथे सोनूला देव मानून त्याची पूजा केली जात आहे.
“त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत चाळीस वार केले”; आदित्य ठाकरे कडाडले
या मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे पाहून यावर बोलताना सोनू सुद भावूक झाला आहे. तो म्हणाला की, अरे माझ्या पाया पडू नका. मला पुजू नका. मी तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बोलले जात आहे की, भारताचा खरा हिरो, सोनु सुद. तसेच त्यांचे बाधलेले मंदिर त्याविषयी माहिती देण्यात आली आहे. हे सर्व पाहून सोनू सुदच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे.
“मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल…”; अभिनेत्री उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत