जळगाव (Jalgaon) येथील पाचोऱ्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कालच्या (दि.23) सभेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सभेतील वक्तव्यांनी नाही तर एका वेगळ्याच कारणाने ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे. या सभेतील रिकाम्या खुर्च्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सभा सुरू व्हायच्या आधीच निम्म्यापेक्षा जास्त रिकाम्या खुर्च्या या ठिकाणी पहायला मिळाल्या. विशेष म्हणजे नागपूर ( Nagpur) मधल्या वज्रमूठ सभेत सुद्धा उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू होताच लोक मैदान सोडून जात होते.
मांजर आडवी गेली तर…जाणून घ्या खरे सत्य! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
यामुळे राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरेंच्या या सभेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान संजय राऊत व गुलाबराव पाटील यांच्यात सभेआधीच झालेल्या खडाजंगी मुळे ही सभा विशेष लक्षवेधक ठरली आहे. खरंतर या सभेआधीच जळगावमधील वातावरण तापले होते. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाहीतर सभेत घुसणार असा इशारा गुलाबराव पाटील यांनी सभेआधी दिला होता.
विराट-अनुष्काला चाहत्यांकडून धक्काबुक्की! व्हिडीओ होतोय व्हायरल
यावर संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील गुलाबराव पाटील यांना चॅलेंज दिले होते. सभेत घुसून दाखवा आणि रोख ५१ हजारांचे बक्षीस मिळवा. असे संजय राऊत म्हणाले होते. इतकंच नाही तर गुलाबराव पाटील यांना गुलाबो गँग म्हणत संजय राऊत यांनी पाटलांना डिवचले देखील होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील समर्थकांनी ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमदार किशोर पाटील यांनी विनंती केल्यानंतर गुलाबराव पाटील समर्थक जळगावला परतले.
यंदाही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रोगराई वाढणार! भेंडवळच्या ‘घटमांडणी’ चा अंदाज