
Petrol Diesel Price । मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे (Diesel Price) दर वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन इंधनाची खरेदी करावी लागत आहे. अगोदरच देशात महागाईचा भडका उडाला असताना इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर होत असतात. (Latest Marathi News)
सरकारी तेल कंपन्यांकडून (State Oil Companies) आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती (Petrol Diesel Rate) iocl च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु आजही आज सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. जाणून घेऊयात शहरातील आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती.
बंडानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार दिसणार एकाच मंचावर, कधी आणि कुठे जाणून घ्या
हे आहेत महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर
- दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई – पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
या ठिकाणी मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
इतकेच नाही तर IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकण्यात येत आहे. या ठिकाणी एक लिटर पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.74 रुपये इतकी आहे. तसेच राजस्थान येथील श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 113.30 रुपये प्रति लिटर, तसेच एक लिटर डिझेलचे दर 98.07 रुपये आहे.
उत्तर भारतात पावसाने घातले थैमान! जनजीवन विस्कळीत, 37 जणांचा मृत्यू