आपल्या रोजच्या जीवनात वाहतूक ( Transport) करण्यासाठी गाड्यांची आवश्यकता असते. बहुतांश लोक जास्त सोयीसाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा (Public Transport) वापर न करता खासगी वाहने वापरतात. ही वाहने वापरत असताना बऱ्याचदा त्यांना गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जावे लागते. पेट्रोलपंपावर फसवणूक (Cheating) होऊ नये म्हणून आपण मशीनवरील झिरोच्या काट्याकडे काटेकोरपणे लक्ष देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? आणखी एका दुसऱ्या पद्धतीने पेट्रोलपंपावर आपली फसवणूक केली जाऊ शकते.
घरातील सोनं मोडून तरुण शेतकऱ्याने कृषी कार्यालयावर उधळले टोपलीभर पैसे; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
पेट्रोल डिझेलच्या मशीनवर काही ठराविक माहिती डिस्प्ले होत असते. याठिकाणी रक्कम, व्हॅल्यूम आणि नंतर घनता श्रेणी दिसते. सामान्यपणे पेट्रोलची घनता श्रेणी ७३०-७७० kg/m3 आहे तर डिझेलची घनता श्रेणी ८२०-८६० kg/m3 आहे. मात्र बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि पेट्रोलपंपावरील कर्मचारी अत्यंत चलाखीने कमी घनतेचे इंधन आपल्या गाडीत टाकतात.
जर निर्देशित घनतेपेक्षा कमी घनतेचे इंधन आपल्या गाडीत टाकले जात असेल तर ते भेसळयुक्त इंधन असते. आजकाल बऱ्याच पेट्रोल पंपावर असे प्रकार होतात. यामुळे पैशांची फसवणूक तर होतेच मात्र आपल्या गाडीचे इंजिन सुद्धा खराब होऊ शकते. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.