Petrol- Diesel Price । लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे दोन रुपयांनी घट झाली आहे. शुक्रवारी (15 मार्च) मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये प्रति लिटर होता, तर 14 मार्च रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर होता. (Petrol- Diesel Price In Maharashtra)
यासोबतच मुंबईत डिझेलचे दरही कमी झाले आहेत. 15 मार्च रोजी मुंबईत डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे. तर 14 मार्च रोजी येथे डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर होते. दररोज प्रमाणेच सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 2 रुपयांनी कपात झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचा दर 104.21 रुपये प्रतिलिटर आहे. आज डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.66 रुपये आहे. तर 14 मार्च रोजी येथे पेट्रोल 106.56 रुपये प्रतिलिटर विकले जात होते. 15 मार्च रोजी नागपुरात पेट्रोलचा दर 104.06 रुपये प्रति लिटर होता, तर 14 मार्च रोजी येथे पेट्रोलचा दर 106.06 रुपये प्रति लिटर होता