गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Petrol-Diesel prices likely to decrease due to Gujarat elections

महागाई ही देशातील सर्वसामान्य लोकांची सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. इंधनदरवाढ हा महागाईचा सर्वात मोठा त्रास देणारा घटक आहे. यापासून वाचण्यासाठी लोक सध्या अगामी गुजरात निवडणूकांच्या ( Upcoming Gujrat elections) प्रतीक्षेत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किमान मताधिक्य राखून ठेवण्यासाठी तरी पेट्रोल डिझेल च्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ नेते शिंदे गटात प्रवेश करणार

जगभरात धुमाकूळ घातलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला काही प्रमाणात फायदा झाला आहे. या युद्धामुळे रशियाकडून भारताला नेहमीपेक्षा कमी दरात कच्चे तेल मिळत आहे. इतकंच नाही तर सध्या इराकने देखील भारताला स्वस्तात पेट्रोल व डिझेल देण्यास सुरुवात केली आहे. रशियापेक्षा चक्क 9 डॉलरने कमी दरात इराक भारताला कच्चे तेल (Raw oil from Irak) देत आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात होऊ शकते.

येत्या चार दिवसात जनावरांचे बाजार होणार सुरु! पशुसंवर्धन विभागाने दिली माहिती

इतर वेळेस सरकारने या गोष्टींचा फायदा स्वतःची तिजोरी भरण्यासाठी करून घेतला असता. परंतु, अगामी गुजरात व हिमाचल प्रदेश येथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मत मिळवण्यासाठी व लोकांमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी पेट्रोल व डिझेल ( Petrol & Diesel prices) चे दर कमी करणे सोयीचे ठरणार आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *