मुंबई : पीएफआय (PFI) संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी हा निर्णय लागू असेल असे केंद्राने म्हंटले आहे.पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (Students Islamic Movement of India) म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे. या संघटनेची बांगलादेश संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या दोन्हीही दहशतवादी संघटना आहेत. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे”, असे ट्विट करत एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.
मलेरियाची लागण झालीय? चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, डासांपासून असा करा बचाव
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2022
दरम्यान ‘एनआयए’ने मागच्या गुरुवारी १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती. नंतर या तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये छापे घातले. आज पहाटे एएनआय़ने केलेल्या ट्वीटनुसार, “केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांना बेकायदेशीर घोषित केलं आहे. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत असून तो पुढील पाच वर्षांसाठी असेल.”
अशा पद्धतीने करा वाटाणा लागवड आणि व्यवस्थापन? मिळेल भरघोस उत्पन्न