Site icon e लोकहित | Marathi News

Pune: पुण्यात पीएफआयच्या समर्थकांची ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणाबाजी; 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

PFI supporters chant 'Pakistan Zindabad' in Pune; Case registered against 70 PFI workers

मुंबई : शुक्रवारी सायंकाळी पुण्यात (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या समर्थकांनी (Supporters of PFI) पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी (Sloganism) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच कारण म्हणजे संपूर्ण भारतात दहशतवादी कृत्यांना (terrorist acts) आर्थिक पाठिंबा देऊन टेरर फंडिंग करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर NIA आणि ED ने छापे घातले होते.

Herbs For Joint Pain: गुडघेदुखीने त्रस्त आहात? अवश्य वापरा या औषधी वनस्पती, मिळेल आराम

दरम्यान, या छाप्यात 106 म्होरक्यांना अटक केली.म्हणून PFI समर्थकांनी अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलने केली. या आंदोलनांमध्येच आता पुण्यात पीएफआयच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मात्र, हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

आयुष्मान भारत योजनेला चार वर्षे पूर्ण, योजनेमुळे गरिबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या जमाव जमावल्याचा उल्लेख पोलिसांनी गुन्ह्याच्या नोंदीत केला आहे. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

खुशखबर ! ‘या’ पदासाठी परीक्षा न देता मिळणार नोकरी, असा करा अर्ज

Spread the love
Exit mobile version