क्रिकेट (cricket)आणि बॉलिवूडचे (bollywood)खूप जवळचे नाते आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर सोबत विवाह केला आहे. यातील एक जोडी म्हणजे भारतीय संघाचा (Indian Cricket Team) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडे (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच होय. या दोघांनी कोरोनाच्या काळात १३ मे २०२०२०रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज केल. या नंतर आता ते दोघे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत.
किंग खानचा मुलगा आर्यन खानचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून
हार्दिक आणि नताशा यांनी भारतीय पद्धतीने लग्न केलं. लग्नातील काही फोटो हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हार्दिक सोशल मीडियावर सक्रिय असतो. दोघंनी पण लग्नाच्या वेळी स्वप्नातील राजकुमार अथवा राजकुमारी भासावी असाच पेहराव केला होता. त्यांचे हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नाव गेलं, चिन्ह गेलं आता राज्यभरातील शाखाही जाणार शिंदेगटाच्या ताब्यात;
या फोटोमध्ये हार्दिक आणि त्याचा मुलगा अगस्त्यने गडद गुलाबी आणि पांढर्या रंगांचे कपडे परिधान केले आहे. दोघे पण एकदम हँडसम दिसत आहेत. तर हार्दिकचा मुलगा अगस्त्य आई- वडिलांचे लग्न इंजाॅय करत आहे. नताशाने हळदीसाठी एकदम सिंपल लूक केला आहे. तिने हातात अंगठी आणि केस मोकळे सोडून बिंदी लावली आहे. तरीही तिच्यावरून प्रेक्षकांच्या नजरा हटत नाहीयेत.