डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आता या वक्तव्यामुळे नवीन वाद सुरु झाला असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात येत आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांसह केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता, तरीही का पेटतोय सीमावाद?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या केल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.
बारामतीतील बालसुधार गृहातील मुलाचे स्पर्धा परीक्षेत यश; स्वतःच्या हिंमतीवर झाला अधिकारी
चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.