Pik Vima : बऱ्याचदा शेती करताना नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान टाळण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेसाठी मागच्या काही दिवसापासून शेतकरी अर्ज देखील करत आहेत.
Ibrahim Ali Khan | इब्राहिमचा शर्टलेस व्हिडीओ व्हायरल; कमेंट करत नेटकरी म्हणाले, “हा तर खूपच…”
मात्र अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले नाहीत. त्याच कारण असं की, राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाले यामुळे पेरण्या करण्यास देखील उशीर झाला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले नाहीत. याचाच विचार करून सरकारने पीक विम्यासाठी मुदतवाढ केली आहे. यासंदर्भात धंनजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
Seema Haider Case । एक वेळचं जेवणही मिळणं कठीण, सीमा हैदरमुळे वाढल्या सचिनच्या समस्या
पहा धनंजय मुंडे यांचे ट्विट
या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा. असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 31, 2023