अगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची ( Narendra Modi) दमदार तयारी सुरू आहे. अशातच राजधानी दिल्ली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत ठीकठिकाणी मोदी हटाओ, देश बचाओ असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हे बॅनर्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
फाटक्या नोटांना कंटाळलात! ‘या’ ठिकणी बदलून मिळतात नवीन नोटा
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकूण 6 संशयितांना अटक केली आहे. तसेच 100 हुन अधिक जणांवर एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात लागलेल्या पोस्टर्समुळे दिल्ली पोलिसांवर देखील ताण असून त्यांचाकडून अधिक खोलात तपास सुरू आहे.
13 वर्षाची मुलगी बनली ऑडी क्यू 3 ची मालकीण; गाडीची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
ताब्यात असलेल्या 6 जणांची चौकशी केली असता, एका राजकीय पक्षाच्या (Political Party) सांगण्यावरून आपण असे केले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. यावरून दिल्लीतील ( Delhi) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर छापखाण्याचा नंबर देण्यात आलेला नाही. यामुळे पोस्टर नक्की कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणी लावले याचा शोध घेणे पोलिसांना अवघड जाणार आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तामध्ये भूकंपाने 9 ठार तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी