
एसटी ही प्रवासच खूप महत्वाचं वाहन आहे. परंतु एसटीमधील आसन व्यवस्था, खिडकीवरील भाग, एसटी बसच्या बाहेरील बाजू या ठिकाणी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टीकर्स आणि पॅम्पलेट लावून जाहिरातबाजी करण्यात येते. या जाहिरातींच्या स्टिकर्समुळे बसचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे आता एसटीच्यावतीने या जाहिरातबाजांवर कठोर कारवाई करुन दंड वसूल करण्यात येणार आहे. फक्त दंडच वसूल नाही तर पोलिसांत तक्रार देखील देण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी आता एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने अनधिकृत जाहिरातदारांविरोधात आक्रमण केले आहे.
काय सांगता! अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधले तेल घेण्यासाठी गरीबांची धावपळ, समोर आल कारण
सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मग यामध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती दिल्या जातात. परंतु अनेकांकडून एसटीच्या नेटवर्कचा फायदा घेत मोफतची जाहिरातबाजी करण्यात येते. परंतु यांवर कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. परंतु आता या संदर्भात अनधिकृत जाहिरातदाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर यासोबतच दंडही वसूल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभाग प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
बिर्याणीतील मसाल्यामुळे होतय पौरुषत्व कमी, TMC च्या ‘या’ नेत्याचा आगळावेगळा दावा
एकीकडे नागपूर शहर स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे चौकाचौकात अनधिकृत पोस्टर्स, स्टीकर्स लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे स्टिकर्स फक्त भिंतीच नव्हे तर स्मार्टसिटीचे जंक्शन बॉक्स आदींवर लावण्यात येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे यावर अनेकवेळा हायकोर्टाने ताशेरे ओढल्यावरही आतापर्यंत ठोस कारवाई मनपाच्यावतीने (Nagpur Municipal Corporation) करण्यात आलेली नाही. म्हणून आता यावर मनपानेही शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या, जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांची मागणी