मुंबई : खरीप हंगामानंतर शेतकऱ्याची रब्बी पिकासाठी लगबग चालू होते. रब्बी हंगामामध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची शेतात पिके घेतात. यामध्ये रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे गहू. गहू उत्पादनात भारत सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीतमध्ये येतो. आता काही दिवसातच शेतकरी बांधव गव्हाच्या लागवडीला सुरवात करतील. यामुळे जर गव्हाच्या सुधारित जातीची लागवड केली तर गव्हाच्या शेतीतून चांगली कमाई होऊ शकते. त्यामुळे आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) माहिती सविस्तर पाहणार आहोत.
Bachhu kadu: आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावली 14 दिवसाची कोठडी, कारण…
GW 322 – गव्हाची ही जात मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात पेरली जाते. ही जात 115 ते 120 दिवसांत परिपक्व होते. जवळपास ३ ते ४ पाण्यामध्ये ही गव्हाची जात परिपक्व होते. विशेष म्हणे या जातीची भारतातील सर्व राज्यामध्ये लागवड करता येते.
HD 4728 – या गव्हाच्या जातीचे उत्पादन 55 क्विंटलपर्यंत आहे. HD 4728 (पुसा मलावी) गव्हाची लागवड भारतातील सर्व राज्यांमध्ये करता येते. गव्हाची ही देखील जात 3 ते 4 पाण्यामध्ये परिपक्व होते.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत होणार
पुसा तेजस 8759 – या जातीचे एमपीच्या जबलपूर कृषी विद्यापीठात एक हेक्टरमधून 70 क्विंटल पुसा तेजस गव्हाचे उत्पादन झाले. त्यामुळे या जातीबाबत शेतकऱ्यांची आवक वाढली. विशेष बाब म्हणजे या गव्हाचे बी कमी पाण्यात उत्पादन देण्यास तयार होते.