Adulterated milk । नाशिक : राज्यात मोठ्या प्रमाणावर पशुपालन (Animal husbandry) केले जाते. परंतु यंदा हा व्यवसाय संकटात आला आहे. कारण पाऊस नसल्याने पशुपालकांना जास्त किमतीने चारा विकत घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे दुधाला चांगला दर (Milk Price) मिळत नाही. दुधाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अशातच भेसळयुक्त दूध बनवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील सिन्नर मिरगाव येथे भेसळयुक्त दूध बनवत असणाऱ्या कारखान्यावर जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) छापा टाकला. यात त्यांनी मिल्क पावडर (Milk powder) आणि कॉस्टिक सोडा यांपासून बनवण्यात येणारे लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. जिल्ह्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात येत असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली आहे.
Sharad Pawar । “शरद पवारांच्या मी अजूनही संपर्कात”, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
नागरिकांच्या जिवाशी खेळणारी टोळी जेरबंद केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे. दरम्यान, दूध संकलन केंद्र चालकासह या केंद्राला रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विरोधात सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.