PM Kisan । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १४ हप्ता मिळणार ‘या’ दिवशी; समोर आली मोठी अपडेट

PM Kisan. Good news for farmers! 14 installments of PM Kisan will be received on 'this' day; A big update has come out

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यानंतर शेतकरी आता 14 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला १४ वा हप्ता जारी होऊ शकतो.

Railway Recruitment | अग्निवीरांना आता रेल्वेमध्ये नोकरीची संधी; शारीरिक चाचणी व वयाची अटही केली शिथिल

मागील महिन्यात म्हणजेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी केला होता. देशभरातील 8 कोटींहून जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. परंतु, तरीदेखील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान असे शेतकरी किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606 आणि 155261 वर कॉल करून चौकशी करू शकतात.

महाराष्ट्रातील दंगलींमागे नेमकं कोण? फडणवीस म्हणाले, “100 टक्के हे…”

पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता (PM Kisan yojana) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ईकेवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ईकेवायसी केली नसेल आणि तुमच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक केलेले नसेल तर 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

तरुणामुळे वाचले पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण; वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने टळला अनर्थ…व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *