PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे बंधनकारक; अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे

PM Kisan Yojana | For the 14th installment of PM Kisan Yojana it is mandatory to fulfill 'these' conditions; Otherwise the money will not be credited to the farmer's account

देशातील बहुतांश शेतकरी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे शेतकरी अगामी १४ व्या हप्त्याच्या (14 th installment) प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. ( Demads for 14th installment of PM kisan yojana )

पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, व्हिडिओ पाहून खाजवाल डोकं

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी भूमी अभिलेख अद्यावत करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बँक खाती आधार संलग्न करण्याचे आदेश केंद्रसरकारने दिले आहेत. या तिन्ही बाबींची पूर्तता केल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएमकिसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही. असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

PUBG प्रेमींसाठी खुशखबर; पुन्हा चालू होणार BGMI, ‘हे’ आहेत नवे बदल…

दरम्यान इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम सुरू आहे. तसेच अभिलेख अद्यावत करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण यासाठी तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊ शकता. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत नव्याने सहभागी व्हायचे आहे त्यांनी थेट पीएम किसानच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.

Big Breaking | महाविकास आघाडी अजून मजबूत होणार! राज्यातील ‘हा’ महत्त्वाचा नेता मविआच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *