PM Suryoday Yojana । अयोध्येत राम लल्लाला अभिषेक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. सूर्योदय योजनेंतर्गत सुमारे एक कोटी घरांवर सोलर रूफ टॉप यंत्रणा बसवली जाणार आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेमुळे लाखो गरीब लोकांचे वीज बिल कमी होणार आहे.
खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये या योजनेची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी, भारतीयांच्या घरावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी या माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळाले. (PM Modi launched Pradhan Mantri Suryoday Yojana)
१ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्यात येणार
अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करेल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल. असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
PM Modi Speech । नरेंद्र मोदी यांनी मागितली प्रभू श्री रामांची माफी; भावुक होत म्हणाले…