Site icon e लोकहित | Marathi News

PM Modi Pune Visit Cancelled । पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; PM मोदींचा दौरा रद्द

PM Modi Pune Visit Cancelled

PM Modi Pune Visit Cancelled । पुण्यातील अतिवृष्टीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींनी पुण्यात २२ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचे ठरवले होते, परंतु पावसामुळे दौऱ्यातील सर्व तयारींवर पाणी फिरले. गेल्या दोन तासांत १३१ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे पुण्यातील अनेक रस्ते जलमय झाले.

Akshay Shinde Death । अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

पंतप्रधानांच्या सभेचे ठिकाण पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर निश्चित करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे या स्थळी चिखल साचला होता आणि त्यामुळे डांबरीकरणाची तयारी सुरू झाली होती. तरीही, हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता लक्षात घेऊन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Pune Rain Alert । मोठी बातमी! पुण्यासाठी धोक्याची घंटा; धरणं भरली, अतिवृष्टीचा इशारा

काल दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात अनेक रस्त्यांवर पाण्याचे तळे दिसू लागले. विजेच्या कडकडाटासोबत पावसाने हजेरी लावल्याने शहरात एकच गोंधळ माजला. पाणी साचल्याने विविध ठिकाणी वाहतूक थांबली, त्यामुळे शहरात सुमारे तासभर गाड्या अडकून पडल्या.

BMW ची सर्वात शक्तीशाली XM Label Red भारतात लाँच, फक्त एकच कार उपलब्ध

आधिकारिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या दौऱ्याच्या तयारीसाठी एकूण २०० पोलिसांचे बळ तैनात केले होते, परंतु या परिस्थितीत त्यांनी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचा दौरा पुणे आणि त्याच्या आजुबाजूच्या भागात अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी महत्त्वाचा होता, मात्र, पावसाच्या अनियोजित आव्हानामुळे या सर्व कार्यक्रमांना धक्का बसला आहे.

Ajit Pawar l अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य!

Spread the love
Exit mobile version