Site icon e लोकहित | Marathi News

शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर

Pneumonia disease increasing in goats and sheep? Do 'so' rescue, read in detail

आपण सगळीकडे पाहतो की अनेक शेतकरी (farmers) आपल्या शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणजे पशूपालन करण्यावर भर देतात. मग या जोड व्यावसायांमधून चांगले पैसे मिळवतात. या मध्ये गायी पालन, शेळी-मेंढी पालन (Goat-sheep rearing) मोठ्या प्रमाणात केले जाते. महत्वाचं म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या पालनातूनही कित्येक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. परंतु वेगवेगळ्या ऋतूच्या साथीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते.

कौतुकास्पद! गुणवरे ता.फलटणच्या सानिया दयानंद गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

न्यूमोनिया (Pneumonia) किंवा फुफ्फुस दाह हा सर्व वयोगटातील मेंढ्या आणि शेळ्यांची एक गंभीर समस्या बनली आहे. यातून कित्येक शेतकरी नुकसानिस बळी पडले आहेत. या आजाराने उत्पादनात घट मोठ्या प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र न्यूमोनिया आजारावर उपाय कोणते? याविषयी शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत खडकी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वाटप

पशूंना ही दिसतात न्यूमोनियाची लक्षणे

1) एकाच जागेवर बसून राहतात यासह डोळ्यातून नाकातून चिकट स्राव येतो.
2) डोळे लालसर दिसतात, अधिक प्रमाणात ताप, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होतो किंवा जलद गतीने श्‍वास घेतात.
3) चरायला निघालेल्या कळपामध्ये मागे पडतात.

Narendra Modi: मोदी सरकारचा देशवासीयांना मोठा दिलासा! ‘या’ योजनेची वाढवली मुदत

न्यूमोनियावर प्रतिबंधात्मक उपाय

1)न्यूमोनिया (Pneumonia) हा संसर्गजन्य आजार आहे. दरम्यान यावेळी आजारी जनावर ओळखून वेगळे लगेच करा.
2)आजारी जनावरांची पशुवैद्यकांच्या मदतीने प्रतिजैवके वापरून त्वरित उपचार करावेत.
3) शेडमध्ये शेळ्या किंवा मेंढ्याची अधिक प्रमाणात गर्दी होणार नाही असे ठेवावेत.म्हणजे शेडमधील हवा खेळती राहील.
4)नेहमी शेड स्वच्छ ठेवावे, जेणेकरून जनावरांच्या मलमूत्रापासून अमोनियासारखा वायू तयार होणार नाही.
5)प्रतिकारकशक्ती उत्तम राहण्यासाठी स्वच्छ पाणी व संतुलित आहार द्या.
6)वेळोवेळी जंतनाशक औषध (Deworming medicine) द्या .तसेच सोबतच विविध आजारांच्या विरुद्ध लसीकरण करून घ्या.
7)न्यूमोनियाने एखादे जनावर दगावला असल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावावी.यासाठी जाळणे किंवा खोल खड्ड्यात पुरावे.
8)या पद्धतींचा अवलंब केल्यास बाधित जिवाणू किंवा विषाणू इतर जनावरांमध्ये पसरणार नाही.

IND vs SA: टीम इंडीयाच्या प्लेंइग 11मध्ये ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी, कर्णधार करणार मोठा फेरबदल

Spread the love
Exit mobile version