
Poco M6 Pro 5G । सध्या स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बजेट स्मार्टफोन सेगमेंट मध्ये पोको कंपनीने एक नवीन फोन लॉन्च केला आहे. POCO M6 Pro 5G असं या फोनचं नाव असून या फोनची किंमत देखील खूप कमी आहे. अगदी कमी किमतीमध्ये जास्त फीचर देण्याचा प्रयत्न या फोनमध्ये करण्यात आला आहे. 9 ऑगस्ट पासून हा फोन ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.
जाणून घ्या फीचर्स
या फोनमध्ये6.79 इंच एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोरिला ग्लास प्रोटेक्शन आणि 90Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यामध्ये साईड माउंट एड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल पाहिले तर 5000 mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनच्या कॅमेऱ्याचे काय आहेत वैशिष्ट्ये?
आपल्याकडे बरेच जण फोन खरेदी करायचा असेल तर त्याचा कॅमेरा हा चांगला असेल तरच तो खरेदी करतात आता. या पोकोच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची नेमकी काय खासियत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. या फोनमध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यातील मुख्य कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे तर दुसरा कॅमेरा 2MP चा आहे. त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी समोरील बाजूला 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Sanjay Raut । “पिसाळलेलं कुत्र चावलं त्यामुळं…” संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची बोचरी टीका