Site icon e लोकहित | Marathi News

दहावीच्या परीक्षेत मुलाला कॉपी पुरवणाऱ्या बापाला पोलिसांनी केली बेदम मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल

Police brutally thrashed father who provided copy to son in 10th exam; The video is going viral

राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. (HSC & SSC Exams) या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. मात्र तरीदेखील राज्यात पेपर फुटल्याचे व कॉपी झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशातच जळगाव मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या पाल्याला कॉपी पुरवणाऱ्या एका पालकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

कपडे बदलतानाच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यामुळे मला…”

जळगाव ( Jalgaon) जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यात असणाऱ्या अडावद येथील परीक्षा केंद्रावरील हा व्हिडीओ आहे. अडावदच्या नूतन ज्ञानमंदिर विद्यालयात दहावीसाठी परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा सुरु असताना पालकांकडून विद्यार्थ्याला कॉपी पुरवली जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. दरम्यान पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर या पालकांनी पळण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र तरीही पोलिसांनी चपळाईने त्यांना पकडून काठीने चांगलाच मार दिला.

शरद पवार यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका

यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे पाल्याला कॉपी पुरवणाऱ्या या पालकांची सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे. मारहाण करणारे पोलिस अधिकारी हे जळगाव पोलिस दलातील आहेत. गणेश बुवा असे त्यांचे नाव असून अडावद पोलीस ठाण्यात ते सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर कार्यरत आहेत.

“अधिवेशन संपले की हे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणार “, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

Spread the love
Exit mobile version