
Pune crime । मागील काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण खूप वाढले आहे कायदे कडक करून देखील पुण्यात गुन्हेगारीला आळा बसला नाही. वाढत्या गुन्हेगारीला बसवणे हे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे कोरेगाव (Koregaon) परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. (Latest marathi news)
Lok Sabha Election । लोकसभेत उमेदवाराला किती खर्च करता येणार? जाणून घ्या महत्वाची माहिती नाहीतर..
त्यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय कुरळे (Dattatray Kurale) असं या पोलीस उपनिरीक्षकांचं नाव असून ते पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. त्यांचा मृत्यू नेमका काशामुळे झाला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही, या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!
त्याशिवाय, शनिवारी नागपुरात एका पोलिसावर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वाहानचालकावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला. या घटनेत हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे असे हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते धर्माळे नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचे वाहनचालक आहेत.