Shrigonda: श्रीगोंद्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, समोर आल धक्कादायक कारण; वाचा सविस्तर

Police officer's suicide in Srigonda, shocking reason comes to light; Read in detail

श्रीगोंदा: श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनमधील (police station) सहपोलीस उप निरीक्षक सुनिल धोंडीबा मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (susaide) केली आहे. सुनिल मोरे हे 54 वर्षांचे होते. ते बेलवंडी येथील काळोखे पेट्रोल पंप शेजारी शिवाजी नगर येथे राहत होते. सुनील मोरे (Sunil more) यांचा घरातील लोखंडी जिण्याला साडीच्या सह्याने गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. दरम्यान मोरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, “त्याला हार्ट अटॅक…”

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात सह्यायक पोलीस उप निरीक्षक म्हणून सुनील मोरे कार्यरत होते. परंतु मोरे हे मागील 3 महिन्यांपासून वैद्यकीय कारणासाठी रजेवर होते. मयत सुनील मोरे आणि बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यात तीन महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. यांनतर सुनिल मोरे हे रजेवर होते. परंतु, मागील तीन ते चार दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक यांनी त्यांना बोलाऊन घेउन त्यांच्याकडील गुन्हे पोलीस ठाण्यात जमा करून घेतले. तेंव्हापासुन ते मानसीक तणावामध्ये असल्याचे जाणवत होते.

मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी

दसरा असल्यामुळे घरचे पूजेसाठी फुलं आणि सोनं आनण्यासाठी बाजारात गेल्यानंतर त्यांनी घरातील लोखंडी जिन्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेऊन, आपले जीवन संपवले. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ बाळासाहेब गणपत मोरे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली. दरम्यान त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Mumbai: डोंबिवलीत आगीत होरपळून आईसह दोन मुलींचा मृत्यु, समोर आल धक्कादायक कारण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *