
रखडलेल्या सरकारी भरत्यांमुळे आजचे तरुण चिंतेत आहेत. अशातच आता रखडलेली पोलीस शिपाई भरती मार्गी लागल्याने चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे. पुणे ग्रामीण (Pune Gramin) साठी 579 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रियेत शारीरिक क्षमता चाचणी व 100 गुणांच्या लेखी परीक्षेचा समावेश आहे. याबाबतची सर्व माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र येणार? राज्यात नव्या युतीची नांदी! चर्चाना उधाण
एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या ( Police recruitment 2022) जिल्हानिहाय जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ही भरती होणार असून 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत Policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर माहिती मिळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. तसेच उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. अशी माहिती भरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
वासुदेव नाना काळे यांची लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत लोकसभांच्या “क्लस्टर सहप्रभारी” म्हणून निवड!