Site icon e लोकहित | Marathi News

Police Recruitment । खुशखबर! राज्यात होणार तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती

Police Recruitment

Police Recruitment । राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात दरवर्षी विविध पदांवर भरती करण्यात येते. अशातच आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्यात तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती (Police Recruitment 2024) करण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. (Maharashtra Police Recruitment)

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या मंत्र्यावर मारहाणीचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यानेच तक्रार दिल्याने खळबळ

“राज्यात २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले असल्याने येणाऱ्या काळात पोलिसांच्या तब्बल १७ हजार ४७१ जागांवर भरती होणार आहे. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली आहे. विधान परिषद नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. (Latest marathi news)

Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी माजी खेळाडूने ठोकला राजकारणाला राम राम

मागील दोन वर्षांतील तुलना करायची झाली तर २०२३ मध्ये ७७ गुन्हे कमी असून राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणी आणि ५१ सायबर प्रयोगशाळा सुरू आहेत. नवीन राज्यस्तरीय सायबर केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील. यासाठी ८०० कोटी मंजूर केले आहेत. २० गस्ती नौका खरेदी करण्यासाठी ११७ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil । मोठी बातमी! जरांगे पाटलांची पुन्हा खालावली प्रकृती, पहिल्यांदाच होतोय ‘हा’ त्रास, डॉक्टर म्हणाले…

Spread the love
Exit mobile version