मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाची आज मंगळवार, दि.4 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यामधील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यामधील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी योजनेस अग्रीम योजनेस देण्याचा निर्णय घेतलाय.
यंदाच्या वर्षी गाळप हंगाम सुरु होण्याआधीच ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल, उपासमारीची आली वेळ
दरम्यान, या घरबांधणी अग्रीमासाठी जवळपास ७ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटीची गरज भासणार आहे. पण शासनाकडे अवधी रक्कम उपलब्ध नाही त्यामुळे आधी प्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Abdu Rojik: काय सांगता! अब्दु रोजिक आहे ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक; वाचा सविस्तर