राज्यात सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांची जयंती जोमात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक मंत्री शुभेच्छा देताना दिसत आहेत. यामध्येच आता भीमजयंतीनिमित्त शुभेच्छा देताना मंत्री दादा भुसे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पावसासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस
मागच्या काही दिवसापासून अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच मागच्या दोन दिवसापासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा चालू आहे. आता यावरून मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दादा भुसे म्हणाले, अजित पवार हे मागच्या अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीत शरद पवार यांना बसणार आणखी एक मोठा धक्का!
दादा भुसे म्हणाले, “अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
भीमजयंतीला लागले गालबोट; विरार मध्ये दोन भीमसैनिकांचा शॉक लागून मृत्यु