Politics News । आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये जाणार…बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Adity Thackeray And Sanjay Raut

Politics News । युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या कोकण दौऱ्यावर शिवसेनेचे 16 चे 160 आमदार होतील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, तुमच्या सोबत 16 आहेत त्याचे दहा होऊ नये याची काळजी घ्यावी अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Pune Fire News । मोठी बातमी! पुण्यामध्ये मध्यरात्री भीषण आग, १० वाहने जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

त्याचबरोबर यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, कोकणात येऊन काय घेता तर बैठका घेता. डिसेंबर नंतर ते बैठका घेण्यासाठी देखील येणार नाहीत काही दिवसानंतर ते जेलमध्ये जाणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील असतील असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Uttarakhand tunnel rescued । मोठी बातमी! उत्तराखंडच्या सर्व श्रमिक योद्ध्यांना मिळणार एक लाख रुपये

आदित्य ठाकरेंनी कोकण दौऱ्यावर अनेक बैठका घेतल्या यावरून टीका करताना नारायण राणे म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहे? त्याला मी गांभीर्याने घेत नाही. सभा नाही घेत आता बैठक घेतोय जाहीर सभेला मैदान लागते पण आता त्याचे खळग झाले असे म्हणत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Accident News । कारला विमानाने दिली मागून जोरदार धडक, चालक आणि पायलट दोघेही जखमी; रुग्णालयात दाखल

आदित्य ठाकरे जेलमध्ये असेल

ठाकरेंकडे जे आमदार होते ते त्यांना व्यवस्थित सांभाळता आले नाही. जे आमदार होते ते दिवसाढवळ्या पळाले . त्यामुळे आता 16 चे 160 होतील का असा कोणता साचा त्याच्याकडे आहे? आदित्य ठाकरे आता बैठकीला नाही तर जेलमध्ये असेल. सुशांत सिंग प्रकरणात तो जेलमध्ये असेल. त्याचबरोबर त्याच्यासोबत संजय राऊतही असेल असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.

Video । भीषण अपघात, खेळता खेळता 3 वर्षाच्या मुलीवर काचेचा दरवाजा पडला, धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Spread the love