Politics News । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar met Sharad Pawar.)
Independence Day । सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मोफत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने देखील वृत्त दिले आहे. या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या चर्चा झाल्याने राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राजकीय हालचालींना वेग! शरद पवार आणि अजित पवारांची गुप्त बैठक
त्यानंतर आता या भेटीवर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहे. यावरूनच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट गुप्त राहिलेली नाही. त्याचे फोटो व्हिडिओ माध्यमांकडे आहेत तर पक्ष फुटी नंतर दोन्ही नेते भेटत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वातावरण करत आहेत. त्यामुळे नक्की काय सुरू आहे हे दोघांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. असं चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.
flooded । पूरग्रस्त भागातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; लवकर मदत जाहीर केली नाही तर आंदोलनाचा इशारा