Site icon e लोकहित | Marathi News

Politics News । राजकारणात मोठा भूकंप? महायुतीचे बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Sharad Pawar

Politics News । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या दिशेने नेत्यांचे वळण अधिक स्पष्ट होत आहे. महायुतीतील अनेक बडे नेते आता महाविकास आघाडीकडे वळू शकतात, असा दावा केला जात आहे.

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचा विरोध; कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक, बापू पठारे आणि मदन भोसले यांचा समावेश आहे. अकलूज येथील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांसह अनेक नेत्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरू आहे.

Apple iPhone 16 | गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?

महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यत्वासाठी संपर्क साधला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एक मजबूत समर्थन मिळू शकते.

Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case । डॉक्टर पत्नीने पतीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं; सुसाइड नोटने उडवली खळबळ

महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या संभाव्य नेत्यांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, दीपक साळुंखे, मदन भोसले, दीपक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, बापू पठारे आणि कोल्हापूरचे राहुल देसाई यांचा समावेश असू शकतो. यासोबतच, पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि पुण्यातील इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Discount on Toyota Cars । टोयोटा वाहनांवर धमाकेदार सूट! अर्बन क्रूज़र, फॉर्च्युनर, हिलक्स आणि इतर कारवर 5 लाख रुपयांपर्यंतची सूट

राजकीय वर्तमनांनुसार, महाविकास आघाडीच्या या सदस्यत्वामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला एक नवा रंग येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

Badlapur School Rape Case Update । बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love
Exit mobile version