Politics News | बोरिवलीमध्ये भाजपामध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाने बोरिवलीत संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानंतर शेट्टींनी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पत्रकारांशी बोलताना शेट्टींनी स्पष्ट केले की, “मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि माझ्या हृदयात आणि डोक्यात कमळ आहे,” असे ते म्हणाले.
Eknath Shinde । मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचे सर्वात मोठे वक्तव्य!
शेट्टींनी भाजपाशी असलेल्या नात्याबद्दलही भाष्य केले. “मी पहिल्या दिवसापासून पक्ष सोडलेला नाही. पक्षाला काम करावे लागते, आणि मी अजूनही पक्षहितासाठी काम करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. शेट्टींच्या या वक्तव्याने त्यांचा पक्षातला ठामपणा दर्शवितो. गेल्या काही काळात भाजपाकडून शेट्टींची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही शेट्टींची भेट घेतली, पण त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.
Ajit Pawar । अजित पवार यांनी आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा केला
शेट्टींनी आपल्या निवडणुकीतील उद्दिष्टांबद्दलही बोलताना म्हटले की, “माझी लढाई पक्षातील काही व्यक्तींच्या विरोधात आहे, ज्यामुळे पक्षाची हानी होत आहे.” त्यामुळे बोरिवलीतील आगामी निवडणुकीत गोपाळ शेट्टींचा आणि भाजपाचा सामना लक्षवेधी ठरणार आहे, हे स्पष्ट आहे. शेट्टींनी जाहीर केले की, ते समाजहितासाठी या निवडणुकीत उतरले आहेत आणि बोरिवलीकरांच्या आत्मसन्मानाचीही काळजी घेत आहेत.